कांदा चाळ योजनेसाठी आँनलाईन अर्ज येथे करा
नमस्कार शेतकरी मित्रांनो शासन शेतकऱ्यांसाठी नेहमी मदत करत आहे तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरात घसरण होत आहे त्या मुळे आपला शेतकरी शेतात पिकवलेला कांदा बाजारात न नेता त्याची साठवणूक घरी करण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो कांदा साठवणुकी साठी शासन शेतकऱ्यांना २५%अनुदानावर कांदा चाळ देत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या योजनेची माहिती.
*कांदा पिकाचे महत्व*
मित्रांनो कांदा पिकांची लागवड महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, बुलढाणा, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते तर मित्रांनो कांदा पिकांसाठी भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तर मित्रांनो महाराष्ट्रातुन मागील वर्षी सात लाख मेट्रो टन कांदा उत्पन्न प्राप्त झाले आहे.
*कांदा चाळ योजनेचे महत्त्व व उदेश*
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळी साठी शासन शेतकऱ्यांना नेहमीच मदत करत असते. उत्पादित कांद्याची घरात साठवणूक केल्यास कांद्यांना मर लागते.म्हणजे कांद्या कांदा नसतो .त्या कांद्यांना पुरेशी हवा न मिळाल्यामुळे तो कांदा नसतो मित्रांनो कांदा चाळणी मुळे कांदा हा कमी प्रमाणात खराब होतो तर मित्रांनो जाणून घेऊया कांद्या कांदा चाळीसाठी अर्ज कुठे व कसा करावा.
* योजनेची उद्दिष्टे *
कांदा पिकाची नुकसान कमी करणे कांदा पिकाचे भाव वाढवून कांद्याचे भाव कोसळणे व हंगामाव्यतिरिक्त कांद्याच्या तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्यावर अशक्त नियंत्रण मिळवणे.
*कांदा चाळ योजनेसाठी पात्रता*
सातबारा वर नमुना नंबर 8अ वर शेतकऱ्यांची नावे नोंद असणे, कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक. शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे आवश्यक.
*या योजनेची लाभार्थी*
कांदा उत्पादक शेतकरी.
शेतकऱ्यांचा गट.
शेतकरी महिला गट.
शेतकऱ्यांचे उत्पादक संघ.
नोंदणीकृत शेती संबंधित संस्था.
शेतकरी सहकारी संस्था.
सहकारी पणन संस्था.
शेतकऱ्याची निवड झाल्यास सातबारा व नमुना नंबर 8, स्थळदर्शक नकाशा DPR वस्तू सीमा, आधार क्रमांक लिंक असलेले बँक खाते पासबुकची छायांकित प्रत, जातीचे प्रमाणपत्र ,हमीपत्र, बंधन प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे आवश्यक.
*लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
१).सातबारा .
२).नमुना नंबर 8अ .
३).आधार कार्ड लिंक पासबुक खाते .
४).अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र.
*अर्ज कोठे व कसा करावा*
शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकता. अर्जाची पद्धत ऑनलाइन .अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
0 Comments