डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना २०२३-२०२४ साठी अर्ज कसा करावा जाणून घ्या?
शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीला पाण्याची गरज असते. मित्रांनो विहीर घेण्यासाठी .शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीसाठी शेतकऱ्यांना मदत करत आहे. तर मित्रांनो आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
*डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीसाठी अनुदान*
नवीन विहिरीसाठी २.५० लाख रुपये अनुदान तर ,जुनी वीर दुरुस्ती करण्या साठी शासन 50 हजार रुपये अनुदान देत आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बोरिंग साठी २० हजार रुपये दिले जातात. अशा अनेक बाबीसाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत केली जाते .या योजनेसाठी मुंबई ,सिंधुदुर्ग रत्नागिरी ,सातारा ,सांगली व कोल्हापूर ही जिल्हे वगळता. ही योजना सर्व जिल्ह्यांना लागू होईल.
*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी पात्रता*
१)लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक.
२)लाभार्थ्याकडे जातीचा वैद्य दाखला असणे आवश्यक.
३)जमिनीचा सातबारा व नमुना नंबर आठ उतारा सादर करणे आवश्यक.
४)तलाठी उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक. लाभार्थ्याकडे जमीन 0.20 ते 6 हेक्टर पर्यंत असणे आवश्यक आहे.नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर असणे आवश्यक.
*डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे*
*नवीन विहिरीसाठी कागदपत्रे*
१).जातीचे प्रमाणपत्र.
२). सातबारा व नमुना नंबर 8 अ उतारा.
३). तहसिलदाराचे मागील वर्षाचे १.५० लाखापर्यंत उत्पन्न.
४).अपंग असल्यास प्रमाणपत्र.
तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला 0.40 ते 6 हेक्टर मर्यादित विहीर नसल्यास बाबत प्रमाणपत्र .जवळील क्षेत्रात 500 फुटांपेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला.
५). भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
६). कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र.
७). गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
८). ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो. (महत्त्वाच्या खुणा सहित व लाभार्थ्यांच्या फोटो सहीत असणे आवश्यक.).
९). ग्रामसभेचा ठराव.
१०). लाभार्थी प्रतिज्ञापत्र (१००/५००चा स्टॅम्प पेपर).
*जुन्या विहिरीसाठी कागदपत्रे*
१).अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र.
२). तहसिलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र ( १.५० लाखा पर्यंत).
३). सातबारा नमुना नंबर 8 अ.
४). तलाठी यांच्याकडील दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला 0.20 ते ६ हेक्टर मर्यादित विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र.
५). लाभार्थी प्रतिज्ञापत्र (१००/५००च्या स्टॅम्प पेपर वर).
६). कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र.
७). गटविकास अधिकारी यांचे क्षेत्र पाहाणी व शिफारस पत्र.
८). ज्या जागेवर जुनी विहीर दुरुस्ती किंवा इनरवेल होण्यापूर्वी चे फोटो ( महत्त्वाच्या खुणा सहित व लाभार्थ्यांच्या फोटो सहीत असणे आवश्यक आहे.).
९). इनरवेल बोरिंग साठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील
Feasibility report.
१०). अपंग असल्यास प्रमाणपत्र.
*डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे व कसा करावा*
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकता!...
*योजनेचा उद्देश*
गरीब व मागासवर्गीय जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून. या योजनेची सुरुवात शासनामार्फत सुरू केली गेलेली आहे.
अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वरील वाटसप ग्रुप ला क्लिक करा!....
*धन्यवाद*
0 Comments