https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3375581023271537 watermelon farming!हिवाळ्यात टरबूज पिकाची लागवड पद्धती जाणून घ्या?

watermelon farming!हिवाळ्यात टरबूज पिकाची लागवड पद्धती जाणून घ्या?

    हिवाळ्यात टरबूज लागवडीसाठी उपयुक्त वाण व लागवड पद्धती जाणून घेऊ या. 


 

शेतकरी मित्रांनो टरबूज पिके प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाणारे पीक आहे पण आता ते हिवाळ्यात देखील घेता येते.

*हिवाळ्यात टरबूज पिकाची लागवड*

      मित्रांनो टरबूज पीक हे आपल्याला आंतरपीक म्हणून सुद्धा घेता येते .मित्रांनो हिवाळ्यात जर टरबूज पिकाची लागवड करायची. झाल्यास त्यासाठी आपल्याला मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडायची आहे .पाच ते सात इतका सामू असणारी जमीन आपल्याला निवडायची आहे. टरबूज पिकाला आम्लधर्मी जमिनी असल्यास पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर फरक पडतो. त्यामुळे जमिनीचे परीक्षण करून लागवड करणे आवश्यक समजले जाते.

*हिवाळ्यात टरबूज पिकासाठी पोषक हवामान*

हिवाळ्यातील  टरबुजाच्या लागवडी साठी वातावरण हे मोकळे व उबाबदार असणे आवश्यक आहे .टरबूज पिकाला 25 डिग्री सेल्सीयस ते30 डिग्रीची तापमान उत्तम  असल्यास वाढ पुरेशी होते जमिनीत ओलावा असेल .तर टरबुजाचे पीक चांगले राहते. या पिकाला वादळी वाऱ्याचा विजेचा धोका असतो.

*हिवाळ्यातील कलिंगड पिकावर पडणारी कीड व रोग*

१).भुरी: या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाणी पिवळी होऊन गळू लागतात. या रोगापासून बचाव करण्यासाठी कार्बोडीझीम हे औषध दहा ग्रॅम पती 90लिटर पाण्यात विरघळून दर पंधरा दिवसाला द्यावे. तीन ते चार वेळा फवारणी करावी.

२).केवडा: या रोगामुळे  पानावर पिवळ्या रंगाची ठिपके पडतात. व पुढे या रोगाचा प्रसार झाडाच्या पूर्ण फांद्यावर होतो. या रोगापासून बचाव करण्यासाठी जंतुनाशकाची फवारणी करावी.

३). मर: हा रोग बुरशीमुळे होतो पिकाला फुले लागल्यावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांमध्ये पाणी पिवळी तर फुले गळून पडतात .या रोगापासून पिकाची संरक्षण करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर करावा.

*हिवाळ्यातील कलिंगड लागवडीसाठी प्रमाण*

हिवाळ्यात कलिंगड लागवड करण्यासाठी प्रति हेक्टर अडीच ते तीन किलो पर्यंत बियाणे लागू शकते.

*हिवाळ्यातील कलिंगड पिकावर पडणारी किड व आळी*

टरबूज पिकावर मावा फळमाशी, तांबडी किडे, भुंगे, कीटकांचा प्रभाव पडतो. तर फळे मोठे झाल्यास त्यावर अळी फिरते त्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी.

*हिवाळ्यातील कलिंगड लागवडीसाठी बियाणे*

मेलोडी कलर्स सीड -70ते 85दिवस.

सागर किंग -85 ते 70दिवस.

मॅक्स बीएसएफ -65 ते 70 दिवस.

इंडेस ब्लॅक पॉप्स-70 ते 80 दिवस.

सिजेंटा सुपर किंग -60 ते 65 दिवस.

*हिवाळ्यातील कलिंगड लागवडीसाठी पूर्व मशागत*

कलिंगड लावण्यासाठी आपण निवडलेली जमीन नांगरट करून रोटर करून नंतर बैलाने पाळी घालून तयार करावी .त्यानंतर जमिनीवर चांगल्या शेण खताच्या दहा ते पंधरा गाड्या टाकून घ्याव्यात नंतर आपण ठिबक सिंचन करून. शक्य असल्यास मल्चिंगचा वापर करून टरबूज पिकाची लागवड करावी. लागवड ही मल्चिंग च्या सरीवर झिंक - झ्याक पद्धतीने.एक ते दोन मीटर अंतरावर .एक दोन बिया टाकाव्यात.

*हिवाळ्यातील कलिंगड पिकासाठी पाणी नियोजन*

       या पिकासाठी पाणी जास्त लागते पण वातावरणानुसार पाणी. द्यावे लागते तीन ते चार तास जास्तीत जास्त पाणी द्यावे .लागते पाणी पिकाच्या वाढीवर पाण्याची गरज जास्त असते. टरबूज लागवडीनंतर पहिल्यांदा दोन-तीन आठवड्यामध्ये जास्त पाणी द्यावे लागते .या दिवसात मुळाची वाढ होते टरबूज पिकाला वनस्पती अवस्थेत असताना पाण्याची गरज अधिक असते .तर यावेळी पानांचा व झाडाची वाढ व विकास होतो. टरबूज पिकाला  फुल फळ लागतात अशा वेळी अधिकाधिक पाणी द्यावे लागते. पाणी हे समान सोडणे गरजेचे असते .ते जास्त झाल्यास  पिकाचे नुकसान होऊ शकते.‌ 

                              *धन्यवाद*

या वेबसाईटवरील माहिती पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा! 

https://chat.whatsapp.com/Giri7i49aIZH8H7h5CE2cG



Post a Comment

0 Comments